विद्युत अभियंता ते जागतिक मार्गदर्शक — श्रीकांत पाटील यांची कहाणी

श्रीकांत पाटील, यशस्वी उद्योजक: समाजसेवेच्या दिशेने एक प्रेरणादायी प्रवास

श्रीकांत पाटील हे मूळचे विदर्भातील असून यांनी १९९४ मध्ये शेगाव वरून विद्युत अभियंता पदवी प्राप्त करून नाशिक येथे स्थायिक झाले. दहा वर्षे एका कंपनीत काम केल्यानंतर, २००४ मध्ये त्यांनी अगदी कमी भांडवलात स्वतःचा स्पॉट वेल्डिंग मशीनचे सुटे भाग तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. प्रचंड आत्मविश्वासाने आणि मेहनतीने, पहिल्या पाच वर्षांत त्यांनी भारतातील प्रसिद्ध कंपन्यांना जसे की टाटा मोटर्स, बजाज टेम्पो, पियाजिओ, फियाट, मारुती, अशोक लेलँड, महिंद्रा, जेबीएम, आणि टोयोटा यांना पुरवठा सुरू केला. उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, यामध्ये त्याची पत्नी स्नेहा पाटील यांचे समर्थन महत्त्वाचे ठरले. त्यांची पत्नी, स्नेहा पाटील, संगणक पदवीधर असून मागील चार वर्षांपासून ती त्यांच्या व्यवसायाची देखरेख करत आहेत. त्यांचा मुलगा, आदित्य पाटील, अमेरिकेतून पदवीचे शिक्षण घेऊन सद्य व्यवसायात काम करत असून, लवकरच नवीन स्टार्टअपही सुरू करणार आहे.

श्रीकांत पाटील यांनी पुढील पाच वर्षांत मेहनत करून भांडवल उभे केले, कच्चा माल पुरवठा साखळी स्थापित केली, काम करणाऱ्या कौशल्यांचा विकास केला, आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केला. २००८ मध्ये त्यांनी निर्यात सुरू केली. तेव्हापासून, त्यांची कंपनी — पॅरामाऊंट एंटरप्रायझेस, Top Brand — PARENTNashik १००% निर्यात युरोप, अमेरिका, फ्रान्स, स्पेन आणि सौदी अरेबिया येथील जगविख्यात कंपन्यांना उत्पादनांचा अखंड पुरवठा करते. विशेष म्हणजे, श्रीकांत आजपर्यंत कुठल्याही देशात गेलेले नाहीत.

सतत नाविन्य आणि विकासावर लक्ष केंद्रित करून, त्यांनी उत्पादन, दर्जा आणि पुरवठा यासाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या उद्योजकीय प्रवासावर विविध प्रसिद्ध व्यवसाय मासिकांमध्ये लेख प्रकाशित झाले आहेत.

श्रीकांत पाटील यांनी त्यांचा व्यवसाय मागील २० वर्ष्यात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवला, त्यांना तिथे आनंद मिळाला नाही त्यामुळे त्यांनी आता त्यांचे लक्ष्य आनंद मिळविण्यासाठी त्यांच्या जीवनाच्या प्रवासात जे मिळवले ते समाजाला परत देण्याचे ठरविले व आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचे ठरविले. सर्वांपर्यंत पोहोचायचे म्हणून त्यांनी भारताचे प्रमुख उपक्रम मध्ये भाग घेण्यास सुरवात केले, उपक्रमाच्या व्यवस्थापन समितीनी श्रीकांत यांचे समर्पण बघता विविध उपक्रमध्ये लगेच सामील करून अधिकृत केले. मागील चार वर्षांपासून त्यांचा व्यवसाय त्यांची पत्नी सांभाळत असून, श्रीकांत भारत सरकारच्या विविध उपक्रम आणि योजनांसोबत काम करीत आहेत. मागील चार वर्षांपासून त्यांचा व्यवसाय त्यांची पत्नी सांभाळत असून, श्रीकांत पाटील भारत सरकारच्या विविध उपक्रम आणि योजनांसोबत काम करीत आहेत.

श्रीकांत पाटील हे पहिल्या पिढीचे उद्योजक असून, रोबोटिक वेल्डिंग स्पेअर्स साठी जगविख्यात ब्रँड पॅरेंटनाशिकचे संस्थापक आहेत. केंद्र सरकारच्या उपक्रमांमध्ये जसे की मार्ग, भास्कर स्टार्टअप इंडिया, बायरॅक, एवायई, मायटी स्टार्टअप हब, लीन, झेड एम एस एम ई यांसारख्या विविध योजनांमध्ये प्रमाणित सल्लागार म्हणून ते काम करीत आहेत. तसेच, ८ राज्य सरकारांसोबत व्यावसायिक विकासासाठी काम करीत आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर, पुनर्रचना आणि विकासासाठी युरोपियन बँक(EBRD), युरो एक्झिम बँक (EEB), आफ्रिकन डेव्हलोपमेंट बँक(AfDB), आशियाई विकास बँक (ADB),युनायटेड नेशन्स (UN) आणि युरोपियन युनियन (EU) मध्ये अधिकृत मार्गदर्शक म्हणून ते तिथल्या लहान-मोठ्या उद्योगांना आयात निर्णयात मदत करीत आहेत. श्रीकांत हे युरोपियन इनोव्हेशन कौन्सिल (EIC),आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद(ITC), आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास परिषद (IEDC),आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था (OECD), अश्या विख्यात आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सदस्य तसेच विविध देशातील दूतावास सोबत काम करीत आहेत.

भारत सरकारच्या विविध व्यापार प्रोत्साहन परिषदांमध्ये सहभागी होत असून, त्यांचा उद्देश भारतातील उद्योजकांना निर्यात वाढवण्यासाठी सहाय्य करणे आहे.

श्रीकांत पाटील हे एन एस डी सी (स्किल इंडिया), खादी इंडिया येथे भारत सरकार नोंदणीकृत मूल्यांकनकर्ता व प्रशिक्षक आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मध्ये प्रॅक्टिस प्रोफेसर आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) मध्ये कॉलेज आणि युनिव्हर्सिटीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत. ते स्वतंत्र संचालक, सनदी अभियंता, आणि खादी इंडिया येथे उद्यमी मित्र म्हणून लहान-मोठ्या उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास, सरकारी योजनांद्वारे भांडवल उभारण्यास सहाय्य करतात. ते विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि महाविद्यालया मध्ये विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण, व व्यावसायिक वातावरण निर्माण करणे, स्टार्टअप मार्गदर्शक, आणि सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

श्रीकांत पाटील हे स्टार्टअप्स आणि मेंटॉरिंगमध्ये कौशल्यासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. उद्योजकता आणि व्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी, मार्गदर्शक, सल्लागार आणि समिती अध्यक्ष म्हणून ते विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. ३० वर्षांहून अधिक उद्योग क्षेत्रातील अनुभव असलेले, ते एक वचनबद्ध, मुत्सद्दी आणि नेतृत्वगुण असलेले व्यावसायिक आहेत. श्रीकांत लहान-मोठे व्यवसाय, महिला उद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सोबत समर्पितपणे काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या जागतिक स्तरावर भारत विकसित व आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नांमध्ये, ते भारताची ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी उद्योजकता आणि निर्यात प्रोत्साहनावर विशेष लक्ष देत आहेत. श्रीकांत हे महिन्यातील संपूर्ण दिवस न थकता, मोबदला ची अपेक्षा न ठेवता सतत कार्यरत आहेत आणि आनंद मिळवीत आहेत, ते वेळात वेळ काढून सतत नवीन तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण शिकत असतात, मासिक, वर्तमान पत्र, विविध ब्लॉग यांचे साठी विविध विषयांवर लिखाणकरतात तसेच आवडीने अष्टवक्र गीता, विज्ञानभैरव, गीता, लाओ त्झू, गौतम बुद्ध, भगवान महावीर, सुकरात यांचे सुद्धा अध्ययन करतात.

सध्या श्रीकांत पाटील हे खालील प्रमाणे मदत करतात :

एमएसएमई मदत:

झेड व लीन एम एस एम येई प्रमाणपत्र, ओ एन डी सी — ऑनलाइन व्यवसाय (भारत सरकार), उद्यम आधार एमएसएमई, एक्स्पोर्ट प्रमाणपत्र नोंदणी, स्टार्टअप इंडिया : डीपीआयआयटी, इन्क्युबेशन सेन्टर कनेक्ट, स्किल सेन्टर, एमएसएमईसाठी सरकारी योजना, स्टँडअप योजना, 1:1 मार्गदर्शन, डीपीआर, सीड फंडिंग, क्लस्टर, चाचणी प्रयोगशाळा विकास GoI योजना, निर्यात बिझ सेटअप, व्यवसाय सल्लागार, भाजीपाला, अन्न उत्पादन योजना, सनदी अभियंता प्रमाणपत्र, आयपीआर / ट्रेड मार्क, लोगो नोंदणी, जेम प्लॅटफॉर्म, कौशल्य विकास, उद्योगात शिकाऊ, रोजगार, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स उत्पादन अपलोड करणे, एसइओ सेवा, प्रशिक्षण, उत्तम निर्यातक कसे व्हावे, प्रशिक्षण, बिझ कर्जासाठी बँक कनेक्ट,उद्योजकता सत्रातील उत्कृष्टता, गुंतवणूकदारांना कनेक्ट करा, स्टार्टअपसाठी सह-संस्थापक, स्टँडअप, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, स्मार्ट फॅक्टरी आणि इंडस्ट्री 4.0,रोबोटिक्स रेझिस्टन्स वेल्डिंग प्रशिक्षण, भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील बाजारपेठेचा विकास आणि निर्यातदारांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर, निर्यात दस्तऐवज, सॉफ्ट स्किल्स.

२०२५ मध्ये श्रीकांत पाटील यांना मध्ये ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या राष्ट्रीय समितीत स्थान मिळाले आहे तसेच ते राष्ट्रीय उत्पादकता परिषद (NPC — India) मध्ये स्टार्टअपचे धोरण तयारीत करण्यासाठी वरिष्ठ सल्लागार म्हणून रुजू झाले आहेत.

स्टार्टअपला खालील गोष्टींवर मदत :

स्टार्टअप इकोसिस्टमच्या विकासास समर्थन, नवकल्पना आणि उद्योजकतेची संस्कृती वाढवणे आणि स्टार्टअप्सना त्यांच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यास मदत करणे, नवीन व्यावसायिक उपक्रम विकसित करण्यासाठी सहयोगी संबंध निर्माण करणे, नवोन्मेषकांना आणि सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना संसाधने, मार्गदर्शन/तांत्रिक सहाय्य प्रदान करणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक, स्टार्टअप्स आणि विद्यमान उद्योजकांसाठी उद्योजकता जागरूकता कार्यक्रम विकसित आणि आयोजित करणे, परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्याने तांत्रिक संशोधन करण्यासाठी बौद्धिक आणि पायाभूत सुविधा पुरवणे.

कार्याचा आढावा

आतापर्यंत “स्टार्टअप इंडिया” अंतर्गत संपूर्ण भारतात ३५०+ स्टार्टअप्सना मार्गदर्शन केले गेले आहे. तसेच, विविध योजनांद्वारे ५ कोटी रुपयांपर्यंत सीड फंडिंगची मदत प्रदान करण्यात आली आहे. वाढवानी फाउंडेशन, तेलंगणा फाउंडेशन आणि इतर इन्क्यूबेशन सेंटरांच्या सहकार्याने ७५ हून अधिक स्टार्टअप्सना १:१ मेंटॉरशिप दिली आहे. भारतातील १७ स्टार्टअप्सना आंतरराष्ट्रीय कनेक्ट आणि फंडिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आसाम, पंजाब, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड या राज्यांतील १४ स्टार्टअप्सना मेंटॉरशिप प्रदान करण्यात आली आहे, आणि ७ स्टार्टअप्सच्या व्यवहाराने ६०० ते ७०० कोटी रुपयांच्या पातळीपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. तसेच, २५+ स्टार्टअप्सना “जेम” द्वारे सरकारकडून ऑर्डर मिळविण्यात सहाय्य झाले आहे.

युरोप, अमेरिका, सिंगापुर आणि आफ्रिकेत असलेल्या स्टार्टअप्सना प्रत्येक महिन्यात दोन वेळा मेंटॉरशिप उपलब्ध करून देण्याचे कार्य गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्लॅटफॉर्मवर स्टार्टअप्सना मार्गदर्शन दिले जात आहे. प्रत्येक १५ दिवसांनी, एक्सिम बँक, युरोपियन युनियन, आणि आफ्रिकेतील मोठ्या उद्योजकांना ट्रेड फायनान्स आणि सप्लाय चेनमध्ये मदत केली जात आहे. आतापर्यंत १४ आंतरराष्ट्रीय उद्योजकांना सहाय्य मिळाले आहे. भारतातील २५० उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी ग्लोबल सप्लाय चेनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यासाठी भारत सरकारच्या निर्यात धोरणानुसार अमेरिका, मध्य पूर्व, आफ्रिका आणि युरोपामध्ये सप्लाय चेन स्थापित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भारतातील ३०० हून अधिक निर्यातकांना निर्याताची संधी उपलब्ध झाली आहे.

भारत सरकारच्या विविध योजनांअंतर्गत — स्टॅंडअप इंडिया, ओ एन डी सी, खादी इंडिया, एम एस एम ई, एसटीपीआय, एन एस डी सी, आणि ट्रेड प्रोमोशनल कौन्सिल यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये २ कार्यक्रम आयोजित करून ५०० हून अधिक उद्योजकांना सहाय्य करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २००० उद्योगांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचविण्यात आली आहे. नाशिकमध्ये निमा, महाराष्ट्र चेंबर आणि अन्य राष्ट्रीय स्तरावरील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने १००० हून अधिक उद्योजकांना मदतीचा हात देण्यात आला आहे. हा कार्यक्रम अद्याप सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावर ५००० पेक्षा अधिक उद्योजकांना विविध योजना, निर्यात संधी, आणि मार्गदर्शन प्रदान केले गेले आहे. अनुदान योजना अंतर्गत वर्षभरात १२ कोटी रुपयांपर्यंत विविध क्षेत्रांत नवीन उद्योजक व उद्योजिकांचे निर्माण करण्यात मदत करण्यात आली आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग संघटनांसोबत आणि सरकारी उपक्रमांसोबत सहकार्यासाठी करार करण्याचे कार्य चालू आहे.ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एफ पी ओ , क्लस्टर तयार करणे, त्यासाठी विविध स्थरावर काम सुरु आहे. सध्या ते निमा व महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स मध्ये समिती अध्यक्ष असून त्या माध्यमातून नाशिकमधील विविध कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

भविष्यातील उद्योजक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिकमध्ये १५ महाविद्यालयांमध्ये २००० विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स व उद्योजकतेवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. संपूर्ण भारतभर विविध माध्यमांतून ३००० विद्यार्थ्यांना व्यावसायिक व स्टार्टअप संदर्भात मार्गदर्शन केले गेले आहे. विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कार्यशाळा आयोजित करण्यास, स्किल सेंटरसाठी, इन्क्यूबेशनसाठी, आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांसोबत करार करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

कार्याचा पुरावा: — https://medium.com/@shreekant-patil-mentor/

संपर्क : —

https://shreekantpatilmentor.wordpress.com/

#श्रीकांत_पाटील, #पॅरामाऊंट_इंटरप्रिंसेस, #पॅरेंटनाशिक, #रोबोटिक_वेल्डिंग, #यशस्वी_उद्योजक, #नाशिक, #महाराष्ट्र, #मार्गदर्शक, #स्टार्टअप_इंडिया, #मेंटॉर, #आई_आई_टी, #चार्टर_इंजिनिअर, #सल्लगार, #कॉलीटी_कौन्सिल_ऑफ_इंडिया, #ब्युरो_ऑफ_इंडियन_स्टँडर्ड्स, #बीआईएस_इंडिया, #एक्सपोर्टर, #निर्यातदार, #स्नेहा_पाटील, #आदित्य_पाटील #यशस्वी_उद्योजक #यशोगाथा, #अर्थ-उद्योग #आंतरराष्ट्रीय #राष्ट्रीय #उद्योजक #ShreekantPatil #StartupIndia #Mentor #MSMEHelp #Successstory #SuccessfulEntrepreneur #Nashik #Consultant #BISIndia #NPCIndia #NSDC #ONDC #SkillIndia #Trainer #SocialService #QualityControlofIndia #CharteredENgineer #ParamountEnterprises #PARENTNashik #IITBombay #Illuminate #SnehaPatil #AdityaPatil #Yashogatha #ArthaUdyog #Magazine #RoboticWelding #WeldingExpert #NationalTechnicalCommittee #Member #VicePresident #CommitteeChairman #Entrepreneur #Founder #International #Successful #Life #SocialWork #NationBuilding #Viksitbharat #Motivation #Nashik #Maharashtra

Keep reading